पाटील यांना राष्ट्रीय कार्यसम्राट पुरस्कार

0

भुसावळ। तालुक्यातील निंभोरा येथील रहिवासी तथा नुतन मराठा विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधाकर किसन पाटील यांना मुंबई येथील स्वरकुल फाऊंडेशनतर्फे राष्ट्रीय कार्यसम्राट पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिध्द गायक त्यागराज खाडिलकर होते तर गायिका शकुंतला जाधव, अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर, राष्ट्रीय चित्रपट संघाचे अध्यक्ष बाळासाहेब धंदर, मुंबई पोलीस अधिकारी अमिर सैय्यदउल्ला यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पाटील यांना पुरस्कार देण्यात आला.

पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक, वैज्ञानिक, पर्यावरण, साहित्य व समाजप्रबोधन विषयाची फाऊंडेशनतर्फे दखल घेण्यात आली. त्यांना स्वामी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी येथे लाईफ पॅट्रन नॅशनल युथ प्रोजेक्ट तर महात्मा गांधी सेवाश्रम वर्धा येथे सभासद, नेचर क्लब ऑफ इंडियामध्ये कायदेशिर सल्लागार अशा विविध संंस्थांमध्ये उल्लेखनिय कामगिरी केली आहे. अनेक विद्यालय व महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमांमधून त्यांनी अंधश्रध्दा निर्मुलनपर प्रयोग करुन समाज जागृतीचे कार्य केले आहे.