साक्री । तालुक्यातील कासारे येथील विद्या विकास मंडळ संचलित वसंतराव दादा पाटील माध्यमिक विद्यालयात पालक व शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भुताजी भामरे अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी मुख्याध्यापक के.डी.देसले यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर स्वागतगीत सादर करण्यात आले. दहावीच्या निकालाची परंपरा, शिष्यवृत्ती परिक्षा व इतर उपक्रमांची माहिती वाय.एल.जाधव यांनी दिली. व्ही.जे.सोनवणे यांनी शिक्षक व पालक यांचा परिचय करुन दिला. यावेळी व्ही.एस.सनेर, एम.डी.सोनवणे, एस.ए.भदाणे, ए.सी.तोरवणे आदी उपस्थित होते. या मेळाव्यात विविध समित्यांची निवड करण्यात आली. पाल्यांच्या प्रगती बाबत चर्चा झाली.