पाडळदा थेट सरपंच निवड बिनविरोध

0

११ जागांसाठी आले १० उमेदवारी अर्ज

शहादा । तालुक्यातील पाडळदा ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत ११ जागांसाठी १० उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. सरपंचपदाची थेट जनतेतुन निवड होत असल्याने खान्देशातील सरपंदाच्या उमेदवार बिनविरोध होण्याचा बहुमान पाडळदा या ग्रामपंचायतीला मिळाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची मुदत होती. शहादा तालुक्यात पाडळदा ग्रामपंचायत ही जिल्ह्यात तंटामुक्त म्हणून ओळखली जाते. आदर्श गावाचा बहुमान आजपर्यंत कायम ठेवला आहे. गेल्या २०वर्षा पासून बिनविरोध होण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

२० वर्षाची बिनविरोधची परंपरा
या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूक ११ जागांसाठी लागली होती. शुक्रवारी नामनिर्देश पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवस अखेर ११ जागांसाठी १० उमेदवारी अर्ज दाखल झाले असून एक जागा रिक्त राहिली आहे. यामुळे ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचा बहुमान खानदेशात मिळविला आहे. यात सरपंच पदातील उमेदवार मुलकन मोहन वळवी ह्या असून सदस्यपदातील बिनविरोध उमेदवार दिलप पाडवी, संगीता सुर्यवंशी, वासुदेव माळी, मनीषा चौधरी, रविंद्र पाटील. ,व्दारकाबाई गांगुर्डे, रोशनी कोळी, चत्राम वळवी, मनोज पाटील, संगिता वळवी यांची बिनविरोध निवड झाली. कॉ. मानक सुर्यवंशी, कॉ. ईश्वर पाटील, रमेश चौधरी, दत्तात्रय पाटील, विजय पाटील, रविद्र पाटील ,मोहन चौधरी यांचे सहकार्य लाभले.