पाडळसरे येथील श्री क्षेत्र नागेश्‍वर महादेवाची यात्रोत्सव उत्साहात

0

अमळनेर । ता लुक्यातील श्री क्षेत्र पाडळसरे येथे मंगळवार 21 फेब्रुवारी रोजी श्री नागेश्वर महादेवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली. खान्देशातील गंगा म्हणून भाविकांच्या मनात स्थान मिळविलेल्या सुर्यकन्या तापी नदीच्या दक्षिण तिरावरील श्रीक्षेत्र पाडळसरे येथे सप्त संगमस्थळी पुरातन, जागृत व नवसाला पावणारे श्री नाटेश्वर महादेवाचा यात्रोत्सव नेहमी माघ कृष्ण दशमीला साजरा होतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भाविक यात्रोत्सव साजरा करीत आहेत. यात्रोत्सवाच्या निमित्ताने लोकनाट्य तमाशाचे आयोजनही ग्रामपंचायतीने केले आहे. यात्रोत्सवात पुर्वी पासूनच शाकाहारी नैवेद्य दाखविण्यात येतो.

नवसाला पावणारे, पुरातन, जागृत शिवलिंग काळ्या दगडांपासून निर्मित
भाविकांच्या नवसाला पावणारे, पुरातन, जागृत शिवलिंग जे द्वादश ज्योतिर्लिंग पैकी नाटेश्वर म्हणून भक्तगनांकडून नावलौकिक शिवमंदिर काळ्या दगडांनी निर्मित असून हेमाडपंती बांधकाम कोरीव आरेखन दगड व घुमटाजवळ चार उपदिशांना वाघाच्या मूर्त्या आणि कळसावर भागवत धर्माची पताका, समोरून पश्चिम वाहिनी तापीमैय्या, उत्तर वाहिनी बोरी नदी, दक्षिण वाहिनी अनेर नदी या त्रिवेणी संगमावर भर म्हणून जळगाव-धुळे जिल्ह्यासह अमळनेर, चोपडा, शिरपुर या तिन्ही तालुक्याचा केन्द्रिय संगम अशा सप्त संगम स्थळावर नाटेश्वर शिवलिंग स्थापित आहे.

नविन शिवलिंगाची स्थापना
भाविकांच्या नवसाला पावणारा नाटेश्वर म्हणूनच थोर समाजसेविका अहिल्याबाई होळकर यांनी कपिलेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार समयी नाटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची आख्यायिका सांगण्यात येते. पाडळसरे धरणाच्या निर्मितीत नाटेश्वर शिवलिंगसह मंदिर पाण्याखाली येणार असल्याने नाटेश्वर महादेवाची आठवण म्हणून पाडळसरे ग्रामवासीयांनी नवीन जागेत द्वादश ज्योतिर्लिंग स्थापित करून प्राणेश्वर मंदिराची निर्मिती गेल्या दहा वर्षापुर्वीच केली. तरीही आज ही जुन्या नाटेश्वर मंदिरा शेजारी यात्रोत्सव साजरा करतात. या दिवशी गावातील सर्व जाती धर्माच्या कुटुंबीयांकडून नाटेश्वर महादेवास नैवेद्य दाखविला जातो. नवपुर्तीसाठी येथे पुर्वी पासूनच बोकडबळीची प्रथा नाही यामुळे दाल-बट्टीचा शाकाहारी खान्देशी नैवेद्य देवाला दाखविला जातो.