अमळनेर । नविन पुनर्वसीत पाडळसरे गावी संत तुकाराम महाराज भजनी मंडळ व प्राणेश्वर महादेव मंदिर संस्थान व ग्रामस्थांकडून सालाबादा प्रमाणे या वर्षी गिता जयंती उत्सव निमित्त मार्गशीर्ष शुद्ध पंचमी म्हणजेच शुक्रवार 24 नोव्हेंबर पासुन अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह प्रारंभ होईल तर मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी दि. 1 डिसेंबर रोजी काल्याचे कीर्तन व महाप्रसाद वाटप होउन हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगता होईल.
दैनिक कार्यक्रम
दररोज सकाळी 5 ते 6 काकडा आरती, व 7 ते 12 ग्रथराज ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ व रात्री 8:30 ते 10:30 या वेळेत जाहिर कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून किर्तना साठी वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील नामवंत कीर्तनकार हजेरी लावून किर्तनची सेवा देणार आहेत त्यात दि. 24 रोजी शुक्रवारी ह.भ.प. गोपाल महाराज- दोंडगांवकर, दि.25 शनिवारी ह.भ.प.भोला महाराज -पाडळसरेकर, दि. 26 रविवारी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज- पाळधीकर, दि. 27 सोमवारी ह.भ.प. जगदिश महाराज -जळगावकर , दि. 28 मंगळवारी ह.भ.प. आंबादास महाराज- तावसेकर कळमसरे, दि.29 वार बुधवारी ह.भ.प. विश्वनाथ महाराज- वाडेकर , दि. 30 रोजी रविवारी गिता जयंती उत्सव निमित्त दुपारी 4 ते 6 पालखी सोहळा होऊन विठ्ठल रुक्मिणी मुर्त्यांची व गीता भागवत ग्रथांची जुने गाव व पुनर्वसीत पाडळसरे गावभर मिरवणूक काढण्यात येईल व रात्री हभप कैलास महाराज कुरंगीकर यांचे कीर्तन होऊन सोमवारी दि. 1 नोव्हेंबर शुक्रवारी हनुमान जयंती निमित्त सकाळी 8 ते 10 या वेळास हभप यशवंत महाराज यांचे काल्याचे जाहिर कीर्तन होऊन 11 ते 2 या वेळात महाप्रसाद वाटप होउन हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगता होईल. तरी भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राणेश्वर महादेव मंदिर संस्थान विश्वस्त, संत तुकाराम महाराज भजनी मंडळ व पाडळसरे ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.