यावल : यावल तालुक्यातील पाडळसा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला दोघांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
जगन्नाथ चिंधू भोई (24, पाडळसा, ता.यावल) हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवार, 30 मे रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास तरुण घरासमोर असताना त्याच्या गल्लीतील कुमार सुनील कोळी आणि सुनील आत्माराम कोळी हे जगन्नाथजवळ आले व त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून अश्लील शिवीगाळ करीत लोखंडी मुसळीने मारहाण केली तसेच जगन्नाथ भोई यांच्या कुटुंबियांनादेखील शिविगाळ करून जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. जगन्नाथ चिंधू भोई यांच्या फिर्यादीवरून रात्री उशीरा फैजपूर पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी कुमार सुनील कोळी आणि सुनील आत्माराम कोळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक महेश वंजारी करीत आहे.