पाडळसेजवळ ट्रक उलटला : मध्यप्रदेशातील चालक ठार

यावल : फैजपूरकडून भुसावळकडे पाईप घेऊन जाणारा भरधाव आयशर ट्रक (एम.पी.68 एच.0133) भुसावळ-फैजपूर रस्त्यावर पाडळसे गावाजवळील वळणावर निंबाच्या झाडावर आदळल्यानंतर पलटी झाला. या अपघातात चालक तरुण प्रेमचंद महाजन (35, रा.बहादरपूर, मध्यप्रदेश) हा जागीच ठार झाला.

अपघातानंतर पोलिसांची धाव
अपघाताची माहिती मिळताच धीरज पाटील, विजय पाटील, नकुल पाटील, रजनीकांत पाटील, प्रवीण तायडे, संग्राम कोळी, पांडुरंग कोळी यांनी मदत कार्य केले. यानंतर फैजपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सिद्धेश आखेगावकर, उपनिरीक्षक मकसूद शेख, सुरेश खैरनार, उमेश सानप, विकास सोनवणे, देविदास सुरदास, गोकूळ तायडे, किरण चाटे, योगेश दुसाणे आदींनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. यावल ग्रामीण रुग्णालयात मयत चालकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.