फैजपूर : पाडळसा ते भुसावळ रोड दरम्यान कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला तर कारचे मोठे नुकसान झाले. हा अपघात रविवारी घडला याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकीसह कारचे नुकसान
तुळशीराम धोंडू पाटील (65, रा.एस.एम.आय.टी.नगर, जळगाव) हे आपल्या कार (क्रमांक एम.एच.19 बी.यू.4878) ने रविवार, 28 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास भुसावळकडून फैजपूरमार्गे रावेर येथे जात असताना पाडळसा ते भुसावळ दरम्यान समोरून येणारी दुचाकी (क्रमांक एम.पी.68 एम.जी.9805) ने जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला तर दुचाकीसह कारचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी तुळशीराम पाटील यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात दुचाकी (क्रमांक एम.पी. 68 एम.जी.9805) वरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक महेश वंजारी करीत आहे.