पाडळसेजवळ भरधाव ट्रक उलटला

0

भुसावळ – फैजपूर-भुसावळ मार्गावरील पाडळसे गावानजीक भरधाव ट्रक उलटल्याची घटना गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून अपघाताचे कारण मात्र कळू शकले नाही. ट्रक (क्र.टी.एन.28 ए.पी.0635) हा भुसावळकडे येत असतांना पाडळसे गावाच्या वळणावर उलटला. दरम्यान, थंडीचे दिवस असल्याने सुदैवाने रस्त्यावर वर्दळ नसल्याने प्राणहानी टळली.