पाडळसेत वीज चोरी ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0
यावल : तालुक्यातील पाडळसे येथे सहा जणांवर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. १७ हजार ७६ रूपयाची वीज चोरी केल्याचा आरोप आहे. पाडळसा सहाय्यक अभियंता योजना चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अनिल मधुकर भोई, लक्ष्मण जंगलू भोई, सुरेश सुका हरणे, माया सुरेश भोई लतीका संतोष भोई व सुशीला मधुकर भोई यांच्या विरूध्द यावल पोलिसात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार नागपाल भास्कर करीत आहे.