पाडळसे अपघात ; विवाहितेवर अंत्यसंस्कार

0
भुसावळ : भुसावळ-फैजपूर मार्गावरील पाडळसे गावाजवळ भरधाव ट्रकने उडवल्याने पाडळसे गावातील भारंबे वाड्यातील मीराबाई चंद्रकांत भारंबे (48)  या विवाहितेचा जागीच करुण अंत झाला होता. शनिवारी शोकाकुल वातावरणात सकाळी विवाहितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मोर नदीच्या पुलावर उभ्या असलेल्या मीराबाई यांच्यासह त्यांचे बंधू दिलीप भारंबे (53), वहिनी अलका दिलीप भारंबे (40) उभे असताना भरधाव ट्रक (एम.एच.19 एस.6255) ने धडक दिल्याने अपघात झाला होता तर ट्रक चालक कैलास नारायण सोनवणे (40, अकलूद) हा जखमी होवून त्याची बोटे कापली गेली होती. अपघातानंतर नागरिकांनी ट्रक मधील दारूचे खोके लंपास केले होते. फैजपूर पोलिसात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.