मुंबईत महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सन्मान
फैजपूर- पाडळसे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संजय तुळशीराम भारंबे यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार शुक्रवार, 26 रोजी महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुंबईती रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या कार्यक्रमात देण्यात आला. यावेळी राज्यपाल सी.विद्यासागर राव, राज्यमंत्री दादाजी दगडु भुसे, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, माहिमचे आमदार सदा सरवणकर, राहुल शेवाळे ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ रावजी ढाकणे, राज्य कोषाध्यक्ष संजीव निकम, राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे, यावल तालुकाध्यक्ष रुबाब तडवी, सचिव पी.व्ही.तळेले शाखा, ग्रामसेवक सुनील फिरके, हितु महाजन, संजीव चौधरी, बाळू वायकोळे, दिगंबर जावडे, मिलिंद बाविस्कर, उल्हास पाटील, पाडळसे सरपंच ज्ञानदेव दांडगे, उपसरपंच रजनीकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य किशोर कोळी, ग्रामपंचायत सदस्य खेमचंद कोळी, ऑपरेटर सुलतान पटेल, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर तायडे, क्कार्क ललित चौधरी, पाडळसे येथील सामाजिक कार्यकर्ते अक्षय तायडे, सागर परदेशी उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्र्यांकडून गौरव
ग्रामविकास सचिव यांनी ग्रामपंचायत पाडळसे आपले सरकार सेवा केंद्र याचे वित्तीय समावेशनमध्ये नऊ कोटी रुपयांचा व्यवहार केल्याबद्दल पंकज मुंडे यांनी गौरव केला. आमदार हरीभाऊ जावळे यांनी संजय भारंबे यांचे अभिनंदन केले.