पाडळसे धरणासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही

0

अमळनेर । गेल्या दहा वर्षापासून निधीअभावी पाडळसे धरणाचे रखडले होते. पुढील अडीच वर्षात धरणाचे काम पुर्ण केले जाणार असून त्यासाठी निधी कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. बंद पडलेल्या कामास अधिकृतरीत्या त्यांच्या हस्तेपूजन करुन प्रारंभ करण्यात आला. आमदार शिरीष चौधरी, स्मिता वाघ व जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी कामासाठी नियमित पाठपुरवठा होता.

पाडळसेसाठी 150 कोटी
मागील वर्षी सिंचनासाठी 7 हजार 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यावर्षी देखल 11 हजार 200 कोटी रुपयाची तरतूद करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून महाराष्ट्रासाठी 18 हजार कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत तर अवर्षण प्रवण व आत्महत्या ग्रस्त भागासाठी 11 हजार कोटींची केंद्राकडे मागणी करण्यात येणार आहे. नाबार्ड कडुन 50 टक्के रक्कमेची मदत होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रकल्पासाठी सुमारे 90 हजार कोटी लागणार आहे. त्यात पाडळसरे धरणास तात्काळ 150 कोटी रुपये मंजुरीसाठी ठेवले जाणार आहे.

भुसपादन निवाडा रद्दची मागणी
चुकीच्या पध्दतीने घोषित करण्यात आलेला भुसंपादनाचा निवाडा रद्द करण्यात यावा यासाठी महेंद्र बोरसे यांनी मंत्री महाजन यांना निवेदन दिले. यावेळी कळमसरे येथील सरपंच व ग्रामस्थानीं भाजपात प्रवेश केला. यावेळी डॉ.बी.एस.पाटील, सुभाष चौधरी, भरतसिंग पाटील, बाळासाहेब पाटील, हरचंद लांडगे, लालचंद सैनांनी, प्रफुल्ल पवार, कविता पवार, उदय पाटील आदी उपस्थित होते.