अमळनेर । तालुक्यातील पाडळसे निम्न तापी प्रकल्पास महाराष्ट्र औदोगिक विकास महामंडळाकडून 75 कोटी रूपये निधी मिळाल्याची माहिती माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी दिली महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या शासन निर्णय 20 फेब्रुवारी 2014 नुसार दिल्ली मंबई इंड्सर्टियल कॉरीडॉर धुळेकरीता मंजूर झालेल्या 70.36 दलघमी पाणी आरक्षणापोटी सिंचन पूणर्स्थापनेसाठी भाग भांडवली हिस्सा परिगणित केलेली 145.93 कोटी रकमेपैक्की सदःयस्थितीत 50 टक्के रक्कम देण्यास महाराष्ट्र आधौगिक विकास महामंडळ तयार असल्याने प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सदःय स्थितीत 75 कोटी रक्कम महाराष्ट्र आधौगिक विकास महामंडळाकडून प्रत्यक्ष करारनामा करण्याच्या वेळेस येणार्या ‘कॉस्ट इन्फेशन इन्डेक्स’ नुसार येणारी उर्वरित सिंचन पुनर्स्थापना खार्च्याची रक्कम करारनामा करण्याच्या वेळेस अदा करण्यास आधौगिक विकास महामंडळास महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग यांचेकडील 2 जानेवारी 2017 अन्वये परवानगी देण्यात आलेली असून कार्यकारी संचालक तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांना आधौगिक विकास महामंडळाकडून 75 कोटी रूपये घेवून करारनामा करुन मान्यता दिली असल्याचे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी सांगितले.