पाड्यावरील रहिवाशांची पाण्यासाठी भटकंती थांबणार

0

डोंगरदेजवळ बोअर करून जलपूजन; देवगिरी कल्याण आश्रमाचा पुढाकार

यावल- तालुक्यातील डोंगरकठोरा गावाशेजारील डोंगरदेजवळ देवमोगरा कल्याण आश्रमातर्फे बोअर करून त्याचा जलपूजनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्याहस्ते पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार कुंदन हिरे, मंडळाधिकारी आर.डी. पाटील, डोंगरकठोरा सरपंच सुमनबाई वाघ, उपसरपंच नितीन भिरुड, तलाठी कुंदन जाधव, कोतवाल विजय आढाळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

आगामी काळात दुष्काळाची तीव्रता आणखी वाढणार आहे. ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती होणार आहे, त्यापार्श्वभूमीवर पाड्यावर राहणाऱ्या ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती थांबावी व त्यांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी देवगिरी कल्याण आश्रमातर्फे विविध पाड्यावर बोअर करून दिली जात आहे. याचा शुभारंभ यावल तालुक्यातील पड्यांपासून करण्यात आला. यात गुरुवारी डोंगरदा या पाड्याजवल जलपूजनाचा कार्यक्रम झाला.

पाड्यावर घेतले जिल्हाधिकाऱ्यांनी भोजन
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी बांधवानी सर्वांचे आदिवासी नृत्य करून स्वागत केले. कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर व उपस्थित मान्यवरांनी येथे खिचडी व भोजनाचा आस्वाद घेतला. दरम्यान, रेडक्रॉस सोसायटीतर्फे आदिवासी बांधवाना संसारोपयोगी साहित्य व थंडीपासून बचाव म्हणून कपडे वाटप करण्यात आले.