भुसावळ । गेल्या अडीच वर्षांपासून आयुक्तांपासून जिल्हाधिकार्यांपर्यंत निवदने व पाठपुरावा करुन देखील सेवाशुल्क व सेवाशुल्क वाढीचा फरक मिळत नसल्याने जळगाव जिल्हा एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कर्मचारी संघटनेने अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुंधरा राज्यस्तरीय पाणलोट विकास यंत्रणा, पुणे तसेच प्रकल्प व्यवस्थापक तथा जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन तिव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जळगाव जिल्हा एकात्मिक व्यवस्थापन कर्मचारी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, याबाबत 2015 मध्ये विविध मागण्यांबाबत पाणलोट कर्मचाछयांनी कामबंद आंदोलन केले होते. अपर मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुंधरा पुणे यांनी दिलेल्या तोंडी आश्वासनाने हे आश्वासन मागे घेण्यात आले. 2016 मध्ये कर्मचाछयांना फरक अदा करण्याच्या सूचना अपर मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुंधरा पुणे यांनी दिल्या होत्या. त्यानंतर ही फरकाची रक्कम जिल्हास्तरावर गेल्या 10 महिन्यांपासून प्राप्त होऊन देखील ती आजतागयात संबंधित पाणलोट कर्मचाछयांना प्राप्त झाली नाही. याबाबत संप करुन जिल्हाधिकार्यांना व प्रकल्प व्यवस्थापकांना निवेदन देखील देण्यात आले. तरी देखील जिल्हास्तरावरुन कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. मार्च 2017 नंतर कर्मचाछयांना बेरोजगारीशी सामना करावा लागेल. या सर्व गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा व 31 मार्च 2017 पर्यंत सेवाशुल्क वाढीचा फरकाची रक्कम 27 मार्च 2017 पूर्वी प्राप्त न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर जळगाव जिल्हा एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदिप पाटील, उपाध्यक्ष सुहास पाटील, सचिव ज्ञानेश्वर देसले यांची स्वाक्षरी आहे.