टंचाईच्या चटक्यानंतरही उपाययोजना शून्य ; साक्रीत आमदारांनी अधिकार्यांना सुनावले खडे बोल
साक्री- पाणी टंचाईच्या आढावा बैठकीत काही ग्रामसेवक व्हाट्सअप, फेसबुक व अन्य सोशल मीडियात रंगल्याचे चित्र शनिवारी येथे दिसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले तर आमदार डी.एस.अहिरे यांनी अधिकार्यांना यचांगलेच फैलावर घेतले. आमदार डी. एस.अहिरे यांच्या अध्यक्षखाली बैठकीचे आयोजन पंचायत समितीच्या सभागृहात शनिवारी झाले. आठवडाभारत पाणी टंचाईच्या आढावा घेतला मात्र पुर्ततेची कोणतेही तजवीज बैठकीच्या माध्यमातून झाली नाही. बैठकीपुरतीच पाणीटंचाई मर्यादीत राहत असल्याने प्रत्यक्षात ग्रामीण भागात पाणी टंचाईशी लढणार्या ग्रामस्थांची आबाळच होत असल्याचा सूर उमटला.
साक्री पंचायत सभागृहात पाणीटंचाई बाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला तालुक्याचे आमदार डी.एस.अहिरेंसह तहसीलदार संदीप भोसले, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, पंचायत समितीचे सभापती गणपत चौरे, जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच पाणीपुरवठा विभागाचे अभियंते तसेच तालुक्यातील ग्रामसेवक उपस्थित होते. तालुक्यातील पाणीटंचाईवर दुसर्यांदा बैठक बोलविण्यात आली मात्र निष्पन्न काहीच निघाले नाही. प्रस्ताव पाठविला आहे, मंजूर होण्यामध्ये आहे, अशी उत्तरे अधिकारीर्यांनी दिली. पाणीटंचाईच्या बैठकीत काही तरी तोडगा निघावं म्हणून जि.प. सदस्य व पं.स सदस्य विविध गावांच्या पाणीटंचाईवर प्रश्न उपस्थित करीत आहे मात्र त्यांचे प्रश्न सुद्धा व्हेंटिलेटर ठेवली जात आहे. पुढील आढावा बैठक येत्या 28 तारखेला साक्री तहसील कार्यलयात आयोजित करण्यात आली आहे व तालुक्यातील धरणाचं गाळ काढण्यासाठी प्रस्ताव पाठवावा, असे देखील आव्हान करण्यात आले आहे.