पाणीपुरवठा एक दिवस उशिराने होणार

0

जळगाव । वाघूर योजनेतील मेहरुण स्विमिंग टँकसमोर विद्या फाऊंडेशन शाळेजवळील 1200 मीमी व्यासाची पाईप लाईन पाहणी महापौर व आयुक्त यांनी केली. पाहणीअंती नासाडी विचारात घेता. या कामाची निविदा मंजुर होईपावेतो मागील मंजूर मक्तेदाराकडून काम करुन घेण्यास मान्यता दिली. त्यानुसार गळती दुरूस्तीचे काम उद्या दि. 17 रोजी सकाळी सुरू करण्यात येणार आहे.

नागरिकांनी नोंद घ्यावी
यापूर्वी दुरूस्तीकामी दोन ठिकाणी खड्डे खोदूनही गळतीचा शोध लागलेला नाही. पाईपलाईनमध्ये कर्मचारी पाठवून गळती दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. वाघूर रॉ वॉटर पंपीग येथे दि. 16 रोजी सकाळी 4 वाजता तांत्रिक कारणास्तव विद्युत पुरवठा 6 तास खंडीत झाल्याने काही भागात पाणीपुरवठा होऊ शकलेला नव्हता. सिंधीकॉलनी परिसर, जुनेजळगाव, ओंकारनगर भागातील पाणी दि. 17 रोजी येईल. तसेच विद्या फाऊंडेशन जवळील गळती दुरूस्तीचे कामामुळे दि. 17 रोजीचा नियमित पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आलेला असून पाणी पुरवठा दि. 18 रोजी करण्यात येईल. तसेच दि. 18 व दि. 19 रोजी होणारा पाणी पुरवठा दि. 19 व दि. 20 रोजी होईल.