पुणे । पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा प्रकार घडतोय तो अनाठायी आणि चुकीचा असून सत्ताधार्यांकडून घाणेरडे राजकारण खेळले जात असल्याची तीव्र प्रतिक्रिया माजी सभागृह नेते, नगरसेवक सुभाष जगताप यांनी व्यक्त केली.पुण्यासाठी 19 टीएमसी पाणी मिळावे अशी मागणी आहे. राज्य सरकार पुणे महापालिकेची हद्द वाढवत आहे, नव्याने 15 गावे येत आहेत. तेथील वस्तीचा विचार केल्यास पाण्याची मागणी आपोआपच वाढते,शिवाय महापालिका हद्दीलगत 5 किलोमीटर परिसराला पालिकेनेच पाणी पुरवावे अशी शासनाची अपेक्षा आहेच.हि वस्तुस्थिती असताना सरकारचे जलसंपदा खाते एकदम पाणी कपातीचे पत्रक काढते, मेहरबानी केल्याप्रमाणे जलसंपदा मंत्री पत्रक फेब्रुवारीपर्यंत स्थगित करतात, हा पुणेकरांना न परवडणारा खेळ चालविला आहे, असे जगताप यांनी सांगितले.
शहराला समान पाणीपुरवठा करावा करावा अशी योजना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीने आणली होती शिवाय केंद्र सरकारच्या नेहरू अनुदान योजनेतून ती पूर्ण करावी असा प्रयत्न होता.भाजप सरकारने नेहरू योजना गुडाळून टाकली आणि दुसरीकडे 24’7 ची योजना आणली. याकरिता 2500 कोटी खर्च अपेक्षित आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती हा खर्च पेलविण्याइतकी सक्षम नाही. योजनेतून पालिकेला किती उत्पन्न मिळणार? हा प्रश्न आहेच, असे जगताप म्हणाले.