पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनीचे काम मार्गी लावा

0

उपमहापौर सुनील खडके यांचे अधिकार्‍यांना निर्देश

जळगाव: शहरातील शिरसोली रोड परिसरासह प्रभाग 13 मध्ये विविध परिसरांना उपमहापौर आपल्या दारी अभियानांतर्गत उपमहापौर सुनिल खडके यांनी गुरुवार, 10 डिसेंबर रोजी भेट दिली. शिरसोली रोडवरील श्री श्री लेक प्राइड येथुन दौर्‍याला प्रारंभ करण्यात आला. यावेळी कॉलनीवासीयांनी उपमहापौर यांचे स्वागत केले तसेच वसतीतील गणपती मंदीरात उपमहापौरांच्या हस्ते श्री गणेशाची आरतीही करण्यात आली. वसाहतीत पाणी पुरवठयासाठी जलवाहीनी नसल्याची माहिती रहीवाशांनी दिल्यानंतर जलवाहीणीचे काम तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश उपमहापौरांनी दिले.

यांची होती उपस्थिती
यावेळी ज्योर्ती चव्हाण, जितेंद्र मराठे, सुरेखा नितीन तायडे, अंजनाबाई सोनवणे यांच्यासह स्थायी समितीच्या माजी सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा, महिला व बालकल्याण समिती सभापती रंजना सपकाळे, स्वच्छता समिती सभापती चेतन सनकत, प्रभाग सभापती मनोज आहुजा, नगरसेविका रेश्मा काळे, मिनाक्षी पाटील, दिपमाला काळे, राहुल वाघ, महेश जोशी आणि महापालिकेचे शहर अभियंता अरविंद भोसले, पाणी पुरवठा अभियंता सुशिल साळुंखे, प्रकल्प विभागाचे अभियंता योगेश बोरोले, प्रभाग अधिकारी संजय पाटील, विद्युत विभाग प्रमुख एस एस पाटील, अभियंता नरेंद्र जावळे, मिलिंद जगताप, मनोज वन्नेरे, अतुल पाटील, अविनाश कोल्हे, संदीप मोरे, रचना सहाय्यक समिर बोरोले, आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

समस्यांचा तत्काळ निपटारा करा
बाहेती शाळेला दुतर्फा लागुन असलेल्या कॉक्रीट उतार रस्त्याखालील माती ढसुन रस्ता उघडा पडत आहे. सुमारे फुटभर जाडीच्या हया कॉक्रीट रस्त्याचे आयुष्य 20 ते 25 वर्षाचे असले तरी रस्त्याखालील मातीची धुप न थांबल्यास हा पुर्ण रस्ता ढसुन नष्ट होण्याचा धोका आहे. त्याचबरोबर अपघात घडुन लगतच्या शाळा प्रांगणात खेळणार्‍या मुलांच्या जीवीतास धोका संभवण्याची भिती आहे. ही बाब परिसर भेटीत निदर्शनास आणुन दिल्याने रस्त्याच्या बाजुला तळापासुन दगडी कठडे उभारण्याची सुचना उपमहौपार यांनी केली.

आदर्श नगरातील तुटलेल्या गटारी, अतिक्रमीत शेड आणि रहदारीस अडथळा ठरणारी पार्क केलेली भंगार वाहने इत्यादी समस्या मार्गी लावण्याचे निर्देश संबधितांना देण्यात आले. उपमहापौर दौर्‍यात आढळणार्‍या समस्यांचे त्वरीत निराकरण केल्यानंतर झालेल्या कामांचे छायाचित्रासह अहवाल देण्याचे निर्देश संबधीत अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.