मुक्ताईनगर – महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील 51 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन शनिवार, 27 जानेवारी बोदवड येथे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली.मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा, माळेगाव व निमखेडी खुर्द यासह बोदवड तालुक्यातील 48 असे एकूण 51 गावांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेत समावेश करण्यात आला आहे. मार्च 2017 मध्ये प्रशासकीय मान्य मिळालेल्या या योजनेसाठी चार हजार 552 कोटी 62 लाख खर्चास प्रशासकीय मान्यता राज्य शासनाने दिली आहे . योजनेचा वित्तीय आकृतीबंध शंभर टक्के राज्य शासन करणार आहे. योजनेचा उद्भव पूर्णा नदी काठावरील हतनूर धरणावरुन असणार आहे. 40 लीटरप्रमाणे दरडोई पाणीपुरवठा असून 2038 पर्यंत 6.77 दशलक्ष लीटर पाण्याची गरज असणार आहे. योजनेचे भूमिपूजन 27 जानेवारी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते होईल तर अध्यक्षस्थानी माजी मंत्री एकनाथराव खडसे असतील. प्रमुख अतिथी म्हणून खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार चंदूलाल पटेल, जिल्हा परीषद अध्यक्षा उज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदू महाजन, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, बोदवड नगराध्यक्ष मुमताज बागवान, पंचायत सभापती गणेश पाटील, शुभांगी भोलाणे आदींची उपस्थिती राहणार आहेत . भूमिपूजन कार्यक्रमानंतर गांधी चौक, बोदवड येथे जाहीर सभादेखील होणार आहे.