पाणीपुरवठा योजनेवरील वायरींग जळाली

0

वरणगाव। येथील शहराला पाणीपुरठा करण्यासाठी तालुक्यातील कठोरा येथील तापी नदी किनारी बांधण्यात आलेल्या जॅकवेलवरील एबी स्वीच व विजपुरवठा करण्यात येणारी वायर जळाल्याने काल रात्रीपासून जलशुध्दीकरण केंद्रावर पाणीपुरवठा ठप्प झाला होता. पाणीपुवरठा विभागाच्या कर्मचार्‍यांनी सकाळ पासून कामाला सुरू केल्याने सायंकाळी
काम पुर्ण होवून पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

जलशुध्दीकरण केंद्रावर झाला परिणाम
गुरुवार 13 रोजी सायंकाळी अचानक वरणगाव शहरातील जलशुध्दीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणार्‍या जॅकवेल मधील एबी स्वीचची वायरीग व स्विच जळाला. यामुळे सिध्देश्वरनगर येथील जलशुध्दीकरण केंद्रावर पाणीपुरवठा ठप्प झाला. पाणी टंचाईची झळ नागरीकांना बसु नये यासाठी सकाळीच पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचार्‍यांनी कामाला सुरूवात केली. यामुळे सदरचे काम सायंकाळ पर्यंत पुर्ण होवून पाणीपुरवठा सुरळीत झाला होता.

जलशुध्दीकरण केंद्रावर सहा लाख लीटर क्षंतेच्या संपात पाणी शुध्द करून साठवलेले असते. सदरच्या पाण्याचा पुरवठा दिवभर करण्यात आला. यामुळे शहरात पाणीपुरठ्यावर कोणताही विपरीत परणाम झाला नाही. वायरींगचे काम करण्यासाठी एक दिवसाचा कालावधी लागल्याने पाणी शुध्दीकरणाची क्रीया देखील सुरू करण्यात आली असुन किरकोळ परिणाम होण्याची शक्यता आहे.