पाणीपुरवठा योजनेस मंजुरी

0

जळगाव । वाघूर प्रकल्प, जळगाव अंतर्गत पुनर्वसित गावठाण रायपूर येथिल नागरी सुविधेअंतर्गत 13.83 लक्ष खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावास सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या मागणी व पाठपुराव्या नुसार विशेष बाब म्हणून तापी पाटबंधारे नियामक मंडळाची मंजुरी मिळाली असून सदर कामाची निविदा काढण्यात आलेली आहे. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा व्यवस्था सुरळित होणार आहे.एकूण 53 लाखाची विविध विकास कामे पूर्ण करण्यात आलेली असून नागरी सुविधेच्या कामांची दुरुस्ती, रस्त्यांवर पाईप क्रॉसिंग बांधकाम करणे व काँक्रीटीकरनांची सुमारे 1 कोटींची कामाचा प्रस्ताव पाठविण्याचे संबंधित.अधिकार्‍यांना सूचित केले आहे. तर 52 लाखाची कामे पूर्णत्वाकडे आहे. रायपूर हे गाव वाघूर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात आल्याने सन 1997 मध्ये या गावी पाणी पुरवठा नागरी सुविधेअंतर्गत विहीर, विंधन विहीर, रायझिंग मेन पाईपलाईन, गाव अंतर्गत पाणी वितरण व्यवस्था व 50 हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधनेच्या कामास 21 लक्ष निधी मंजूर होता व सदर काम त्यावेळी पूर्ण करण्यात आलेले आहे.

निविदा प्रक्रिया पूर्ण
गावाच्या लोकसंख्येत संकल्पित लोकसंख्येपेक्षा वाढ झालेली असल्याने अस्तित्वात असलेला 50 हजार लिटरचा क्षमतेचा जलकुंभ सध्या पुरेसा होत नसल्याने पाणी पुरवठा व्यवस्था कमी पडते. सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते ना.गुलाबराव पाटील यांनी ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन व राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करण्याकरिता सतत पाठपुरावा केला. त्यानुसार तापी पाटबंधारे विकास नियामक मंडळाच्या बैठकीत विषय क्र.55.8 नुसार पुनर्वसित रायपूर गावी लोकसंख्येत वाढ झाल्याने विशेष बाब म्हणून वाढीव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 1.50 लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी (जलकुंभ) व 100 मी. लांबीची रायझिंग मेन पाईप लाईन टाकणे या कामाच्या रुपये 13.83 लक्ष निधी साठी मान्यता देण्यात आली. तसेच सदर कामाची निविदा प्रक्रिया करण्यात आलेली आहे.

2 वर्षांत 1 कोटी कामे पूर्णत्वाकडे
मागील 2 वर्षाच्या कालावधीत गावांत स्मशानभूमी व संरक्षक भिंत (21 लक्ष), पोहोच रस्ते (30 लक्ष) व पथदिवे व पोलसाठी (3 लक्ष) असे एकूण 53 लाखाची कामे पूर्ण करण्यात आलेली आहे. तर सुमारे 2200 मिटर लांबीच्या गटार बांधकाम व काँक्रीटी करणासाठी मागील वर्षी 52 लक्ष निधी मंजूर करण्यात आला होता. सदर काम शेवटच्या टप्यात असून कामे पूर्ण करण्यासाठी तापी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी पी.पी.वराडे, उपअभियंता डी.डी.पाटील तसेच कनिष्ठ अभियंता जे.एस.चौधरी आदींनी प्रयत्न करीत आहे.

1 कोटींच्या कामांचा प्रस्तावाचे निर्देश
सदर वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम मुदतीत पूर्ण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा नियमित सुरू ठेवावा.तसेच गावांतील शाळा दुरुस्ती, गटारी व रस्ते दुरुस्ती तसेच इतर नागरी सुविधांच्या कामांची आवशयक ती दुरुस्ती करणेसाठी 30 लक्ष, गावांतील अंतर्गत रस्त्यांवर पाईप क्रॉसिंग बांधणेचे वाढीव काम 20 लक्ष व पथदिव्यांसाठी व रस्ते काँक्रीटीकरण साठी 50 लक्ष असे एकूण 1 कोटींच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍याना ना.गुलाबराव पाटील यांनी दिले.सदर कामे मंजुरीसाठी ना. गुलाबराव पाटील प्रयत्नशील आहेत.