मुंबई/ठाणे । चटपटीत आणि खुसखुशीत पाणीपुरी पाहून आपल्याही पाणीपुरी खाण्याची इच्छा होते. पण पाणीपुरीची पुरी कशी बनते हे तुम्ही पाहिलं तर तुम्हालाही धक्का बसेल. मुंबईतल्या गोवंडी, मानखुर्द, उल्हासनगर भागात पाणीपुरीच्या पुर्या बनवणार्या 5 कारखान्यांवर एफडीए म्हणजे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी छापे मारले आहेत. उल्हासनगर कॅम्प 3 येथील सन्तु बिल्डिंगच्या मागे सतनाम नावाचा कारखाना आहे. येथे पाणीपुरीचे पीठ पायाने तुडवत असल्याची माहिती ठाणे अन्न आणि औषध शाखेला मिळाली होती. त्यानुसार अधिकारी सी. एच. चव्हाण यांनी पथकासोबत सायंकाळी छापा टाकला. यावेळी पायाने तुडवलेले पीठ आणि हजारोंच्या संख्येने तयार केलेल्या पाणीपुरीचे नमुने ताब्यात घेऊन कारखाना सील केला आहे. या कारखान्यात घाणीचेही सर्वत्र साम्राज्य पसरल्याचे अधिकार्यांना दिसून आले आहे.
हे विक्रेते स्वच्छता ठेवत असल्याचा आव आणत असले, तरी प्रत्यक्षात मात्र कारखान्यात पुरीचे पीठ कसे तयार केले जाते, हे उघडकीस आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.