मुंबई:- यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने खानदेश आणि महाराष्ट्रातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. शासनाकडून 30 जुनपर्यंतच टंचाई असल्याचे निर्देश असल्याने 30 जून नंतरचे प्रस्ताव नाकारले जात आहेत. या महत्वाच्या मुद्द्यावर माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि आमदार किशोर पाटील यांनी विधानसभेत आवाज उठवला.
हे देखील वाचा
टँकर नाही, पाऊसही नाही यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. आता पाऊस पडला तरी पिण्याचे पानी यायला वेळ लागणार आहे. त्यामुळे टंचाईची मुदत वाढवा अशी मागणी खडसे यांनी केली. तर विहिरीच्या खोलीकरण प्रस्तवाला मंजुरी द्या आणि आवश्यक त्या ठिकाणी टँकर द्या अशीही मागणी त्यांनी केली. किशोर पाटील यांनी पाचोरा मतदारसंघ आणि खान्देशातील अनेक भागात पाण्याची समस्या बिकट झाल्याचे सांगत टँकर पुरविण्याची मागणी केली. या मागणीला उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी टंचाईची मदत 30 ऑगस्ट पर्यंत करण्याची घोषणा केली. तसेच आवश्यक त्या ठिकाणी टँकर दिले जातील असेही सांगितले.