पाणी उशाला कोरड घशाला : वरणगावातील प्रकार
राष्ट्रवादी पदाधिकार्यांनी मुख्याधिकार्यांना विचारला जाब : अन्य प्रलंबित मागण्यांबाबत निवेदनाद्वारे साकडे
वरणगाव : शहराला गेल्या काही दिवसांपासून आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांचे प्रचंड हाल होत आहेत. तापी पात्रात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असताना पाणीपुरवठा होत नसल्याने नागरीकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वरणगाव शहरासाठी सात वर्षांपूर्वी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन तयार झाली मात्र ती इतक्या कमी कालावधीत कालबाह्य कशी झाली ? असा संतप्त सवाल वरणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वरणगाव नगरपरीषद मुख्याधिकारी समीर शेख यांना निवेदन देताना उपस्थित करण्यात आला. यावेळी वरणगावातील थांबलेल्या विकासकामांना गती देण्याची मागणी करण्यात आली.
या कामांना सुरूवात करण्याची मागणी
निवेदनाचा आशय असा की, वरणगाव शहरातील जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नागेश्वर मंदिराचे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून भूमिपूजन करून पायखोदकाम झाले असून या कामाला पावसाळ्याआधी सुरूवात करावी, प्रभाग क्रमांक 18 मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृह कामाची वर्क ऑर्डर जून 2020 मध्ये देवूनही अद्यापही सभागृहाचे काम पूर्ण झालेले नाही, संबंधीत ठेकेदार काम करत नसल्यास कायदेशीर कारवाई करावी, प्रभाग क्रमांक 10 मधील 18 मीटरच्या रस्त्यांची मोजणी केल्यास काळाची गरज लक्षात घेऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे लावावीतख प्रभाग क्रमांक 10 मध्ये साई नगर, हनुमान नगर, मच्छिंद्र नगर, लुंबिनी नगर, महालक्ष्मी नगर परीसरात मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे झुडपे वाढलेली असल्याने प्रभागातील नागरीकांना विविध अडचणींनाना सामोरे जावे लागत आहे तसेच वरणगाव परीसरातील पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाल्यांची सफाई करावी जेणेकरून पावसाळ्यात नागरीकांना अडचण होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. वरणगाव शहर आणि परीसरातील रुग्णांच्या सेवेसाठी प्रशासकीय पातळीवर चर्चा करून नागेश्वर मंदिराजवळ (फायर फायटर) ईमारतीमध्ये कोविड सेंटर उभारण्यात यावे व या कोविड सेंटर उभारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वोतोपरी मदत करेल, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी मुख्याधिकारी यांनी दिले.
निवेदन देताना यांची होती उपस्थिती
निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी, माजी नगरसेवक सुधाकर जावळे, युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर पाटील, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पप्पू जकातदार, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष मनोज कोलते, भुसावळ तालुका उपाध्यक्ष मनोज अग्रवाल, प्रकाश नारखेडे, वरणगाव शहराध्यक्ष समाधान चौधरी, उपशहराध्यक्ष कैलास माळी, माजी नगरसेवक विष्णू खोले, माजी नगरसेवक रवींद्र सोनवणे, माजी नगरसेवक साजीद कुरेशी, तालुका सरचिटणीस राजेश चौधरी, महेश सोनवणे, युवक कार्याध्यक्ष विनायक शिवरामे, डॉ.एहसान अहमद, युवक शहराध्यक्ष सोहेल कुरेशी, माजी युवक शहराध्यक्ष अनिल चौधरी, राजेश इंगळे, इफ्तेखार मिर्जा, शेख रीजवान, ओबीसी सेल वरणगाव शहराध्यक्ष हिमालय भंगाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.