नवापुर । पंचायत समिती नवापूर पाणी गुणवत्ता शाखा, पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सेर्वेक्षण कार्यक्रम अंतर्गत गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर व पाणी गुणवत्ता शाखा यांची ग्रामपंचायत निहाय तपासणी सन 2016-17 या आर्थिक वर्षात पाणी नामुने तपासणीत नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यात सर्वधिक एकूण 11211 पाणी नमुने तपासले गेले.नवापूर तालुका महाराष्ट्रात नववे तर देशात सर्वात जास्त पाणी नमुने तपासणी करणारा तालुका आहे. पावसाळा सुरू होत असल्याने पावसाळ्यात जैविक दृष्ट्या पिण्याचे पाणी दूषित होऊन गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ, विषमज्वर, अतिसार, मलेरिया, डेंगू, चिकणगुनिया,दातांचा आणि हाडांचा फ्लोरोसिस आणि पोटाचे आजार इ. साथीरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत पाणी पुरवठा होणार्या पिण्याचा पाण्यावर योग्य शुद्धीकरण व निर्जंतुकीकरण न करता पाण्याचा पुरावठा झाल्यास साथ रोगाचा प्रादुर्भाव होऊन प्रसंगी जीवितहानी होण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी पुरवठयाची जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कोणत्याही जलजन्य साथरोगाचा उद्रेक होऊ नये या बाबत आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शुद्धीकरणासाठी सर्व स्तरावर 33 टक्के क्लोरीन प्रमाण
सांडपाणीच्या विल्हेवाटीच्या उपाययोजना कराव्यात. सर्व स्तरावर 33% क्लोरीन प्रमाण असलेली टि. सी.एल. पावडर व कुटुंबाना सोडियम हायपोक्लोराईड द्रावण व त्रुटी यांचा पुरेसा साथ उपलब्ध करण्यात यावा. असलेल्या सर्व हातपंपाचे क्लोरिनवशन करण्यात यावे. क्लोरोस्कोप द्वारे नियमितपणे ओ टि टेस्ट घेण्यात यावी.पाणी पुरवठा करणार्या पाईप लाईन गटारीतून जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. नियमित स्त्रोतांची पाणी नमुने तपासणी व टी. सी.एल पावडर तपासणी करण्यात यावी. पिण्याचा पाण्याचा स्त्रोतांची पाणी नमुने जैविक व रासायनिक तपासणीसाठी जल सुरक्षक यांचा मार्फत पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेत पोहोच करून पाणी तपासले जाते. पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडर चा वापर करण्यात येतो 33% युक्त आय.एस.आय ग्रेड -1 मार्कचे ब्लिचिंग पावडर वापराने बंधनकारक आहे ब्लिचिंग पावडर मध्ये क्लोरीन चे प्रमाण किती शिल्लक आहे हे ही 20% पेक्षा कमी क्लोरिण असलेले ब्लिचिंग पावडर नित्कृष्ठ दर्जाचे तपासणीत ठरवले जातात. विस्तार अधिकारी किरण गावीत (ग्रा.प), आर.के.गावित(क.सहा).अश्विन वसावे (पाणी गुणवत्ता तज्ञ) हे काम पाहत आहेत