मुंबई । मुंबईला पाणीपुरवठा करणार्या जलवाहिन्या फोडून पाणी चोरीच्या घटना वारंवार घडत असतात. अशा घटनांवर आळा घालण्यासाठी संबंधितांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याबाबत पालिकेच्या जलविभागाच्या हालचाली सुरु आहेत. याबाबत लवकरच निर्णय होईल , अशी माहिती जलविभागातील वरिष्ठ अधिकार्याने दिली. करदात्या मुंबईकरांना मुलभूत सुविधा पुरवणे ही मुंबई महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेच्या जलविभागातफेँ मुंबईला दररोज 3350 दक्षलश सुरळीत व स्वच्छ पाणीपुरवठा केला जातो. मात्र मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाणे, पाणी चोरीला जाणे अशा घटना घडत असतात.
पाणी अनमोल असून पाण्याचा अपव्यय टाळा असे आवाहन जनतेला जलविभागातफेँ वारंवार करण्यात येते. तसेच पाणी चोरी करणार्यांवर गुन्हाही दाखल करण्यात येतो. तरीही जलवाहिन्या फोडून पाणी चोरीच्या घटना सातत्याने घडतच आहेत . विशेष म्हणजे पाणी चोरी करुन ते दुप्पट , तिप्पट दराने विक्री केले जात असल्याचे जलविभागाच्या निदर्षनास आले असून याबाबत नगरसेवकांसह नागरिकांच्या तक्रारीही जलविभागाला प्राप्त झाल्याचे अधिकार्याने सांगितले. त्यामुळे काही समाजकंटकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
स्थायी समितीच्या बैठकीत सदर प्रस्ताव मंजुरीसाठी येणार
जलवाहिनी फोडून पाणी चोरी करणे, चोरी केलेले पाणी विकणे यावर लगाम घालण्यासाठी संबंधितांवर अजामीनपाञ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी नगरसेवक अरविंद दुधवडकर यांनी केली होती. बुधवारी होणार्या स्थायी समितीच्या बैठकीत सदर प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर सदर प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. राज्य सरकारच्या मंजुरीनंतरच अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याबाबत अंमलबजावणी होईल, असे वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. दरम्यान, पाणी चोरी, जलवाहिनी फोडणे हे कोण व्यक्ति करतो याची शहानिशा करणे शक्य होत नाही. त्यामुळे अजामीनपाञ गुन्हा दाखल करण्याची अंमलबजावणी करणे शक्य नाही, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.