सावदा। येणारा काळात पाणी हि जगातील सर्वात मोठी समस्या म्हणून समोर येणार असून आपल्याजवळ असलेला जलसाठा जतन करणे आवश्यक असून येणार्या पिढीस खर्या अर्थाने पाणी व झाडे हीच खरी संपत्ती आपण जतन करुन त्यांना देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन खासदार रक्षा खडसे यांनी केले. येथील उद्योजक हाजी शब्बीर हुसेन हाजी अख्तर हुसेन यांनी स्वखर्चातून उभारलेल्या रेन वॉटर होर्वेस्तिंग व विहीर पुनर्भरण कार्यक्रमाचे उद्घाटन शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.
चांगल्या उपक्रमांचे समाजाने अनुकरण करण्याची गरज
यावेळी पुढे बोलताना त्यांनी शासनस्तरावर असे कार्यक्रम होत असतात मात्र स्वखर्चातून अशा रीतीने समाजोपयोगी कार्यक्रम राबविणे म्हणजे समाज दिशा देण्याचे कार्य असून चांगला पायंडा पाडला असून यावर समाजाने देखील चालण्याची गरज असल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानी माजी खासदार गुणवंतराव सरोदे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हरिभाऊ जावळे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जिल्हा परिषद सदस्य कैलास सरोदे
यांची होती उपस्थिती
पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, उपसभापती अनिता चौधरी, नगराध्यक्षा अनिता येवले, रावेर नगराध्यक्ष दारा मोहमद, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगराध्यक्षा देवयानी बेंडाळे, जगदीश बढे आदी मान्यवर उपस्थित होते.
50 विहिरींना पाणी
यावेळी अध्यक्षस्थावरुन बोलताना माजी खासदार गुणवंतराव सरोदे यांनी भविष्याचा वेध घेत केलेले हे कार्य खरोखर अभिनंदनीय असल्याचे सांगताना, मी देखील माझे कार्यकाळात तेव्हा पुढील गरज ओळखून सुकी नदी पात्रात त्यावेळी रेती व गोटे टाकून बंधार घालून पाणी अडविले होते तेव्हा पुढील वर्षी त्या परिसरातील सुमारे 50 विहिरीना पाणी आले होते असा दाखला देत आज त्याहून अधिक पाणी अडून जिरविण्याची गरज आहे व याचा प्रारंभ सावदा येथून होत असल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन यावेळी केले.