पाणी टंचाई जाणवु नये म्हणून चाळीसगाव वन्यजीव वनविभाग सतर्क

0

चाळीसगाव। मा र्च महिना संपण्याअगोदरच उन्हाच तिव्रता जाणवु लागली आहे. सध्याचे तापमान हे 42 ते 45 अंशापर्यत पोहोचले आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीसाठी खालविण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यात मानवी जीवांसोबतच पशुपक्षांचा पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. पाणीसाठा आटत चालल्याने निसर्गातील पक्षांना पाणी उपलब्ध होत होणार नाही. ही समस्या लक्षात घेऊन चाळीसगाव तालुका प्रशासन सतर्क झाले असून वन्यजीव विभागातर्फे उन्हाळ्यात पक्षांसाठी तसेच वन्यजीवांसाठी पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तालुक्यातील पाटणा गौताळा अभयारण्याती वन्यजीव प्राण्यांना उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून चाळीसगाव वन्यजीव वनविभागाच्या वतीने पिण्याच्या पाण्याची उपाययोजना सुरू असुन आवश्यक त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्यात येणार आहे. पाण्याची कमतरता पडू देणार नसल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली आहे.

पक्षी पलायन रोखण्याचा प्रयत्न
उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची टचांई जाणवायला लागली आहे. मानव प्राणी सोबतच पशु पक्षांनाही याची तीव्रता जाणवणार आहे. चाळीसगाव तालुक्यातील पाटणा व गौताळा अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर वन्यजीव प्राणी पक्षी आहेत हिवाळा व पावसाळ्यात या प्राण्यांना अभयारण्यात अन्न पाणी मुबलक प्रमाणावर मिळते त्यामुळे हे प्राणी जंगल भाग सोडुन पलायन करीत नाही. आता उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरु झाल्याने या प्राण्यांना जंगलात पाणी साठा असेल तर ते पलायन करणार नाही यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

कृत्रीम पाणीसाठी तयार करणार
याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) चाळीसगाव यांचे कडुन माहिती जाणुन घेतली असता त्यांनी सांगितले की पाणलोट मधुन पाणी अडवण्यासाठी मातीबांध, सिमेंटबांध यांची कामे झाली म्हणुन सध्या पाणी साठा जंगलात आहे. परंतु एप्रिल व मे महिन्यात पाणी टंचाई भासु शकते. सध्या गौताळा अभयारण्यात 18 कृत्रिम पाणवठे, 18 नैसर्गिक पाणवठे, 6 पाझर तलाव, 27 सिमेंट बांध व 15 मातीबांध आहेत यामधुन प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळते. एप्रिल मे महिन्यात पाणी टंचाई होत असल्याने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणीसाठा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

अफवा पसरवु नये
उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवते त्यामुळे जंगलातील प्राणी शेजारील गावात येण्याचे प्रकार घडते. अभयारण्यात वन्यप्राणी, पक्षी यांना नैसर्गिक अन्न साठा असतो. त्यात फळे, फुले, कीटक आदी अन्न प्राणी, पक्षी यांना सुरक्षित मिळतात म्हणुन शक्यतो प्राणी, पक्षी जंगलाबाहेर येत नाहीत एप्रिल व मे महिन्यात पक्षी प्राण्यांना पाण्याची कमतरता भासणार नाही. यासाठी उपाययोजना केल्या जातील प्राणी शक्यतो बाहेर येणार नाही. कोणीही अफवा पसरवु नये व जनतेने अशा अफवांना बळी पडु नये असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी एल. एम. राठोड यांनी केले आहे.