चाळीसगाव – घराच्या संरक्षक भिंतीला पाणी मारत असताना शेजारच्या ओट्यावर पाणी पडल्याचा राग येऊन एकास शिवीगाळ मारहाण करुन लोखंडी रॉड हातावर मारुन बोट फ्रॅक्चर केल्याची घटना 12 रोजी सकाळी 7-30 वाजेच्या सुमारास शहरातील शास्त्री नगरात घडली. चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील शास्त्री नगर त्रिशांती बिल्डींग समोरील रहीवासी निंबा एकनाथ अमृतकार (62) एल आय सी एजंट हे 12 रोजी सकाळी 7-30 वाजेच्या सुमारास त्यांच्या घरामागील संरक्षक भिंतीला पाणी मारत असताना त्याचे पाणी शेजारी राहणार्या ज्ञानेश्वर भावलाल चौधरी याच्या घराच्या ओट्यावर पडल्याने त्याचा राग त्याने निंबा अमृतकार यांना शिवीगाळ मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली व लोखंडी रॉड त्यांच्या हातावर मारल्याने त्यांच्या हाताचे बोट मोडले आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला ज्ञानेश्वर भावलाल चौधरी रा शास्त्री नगर त्रिशांती बिल्डिंग जवळ चाळीसगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार धर्मराज पाटील करीत आहेत.