नोव्हेंबरमध्ये संपली मुदत; सहा महिन्याची देणार मुदतवाढ;15 हजार नळसंयोजन पूर्ण
जळगाव– केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम शहरात सुरु आहे. दोन वर्षात योजनेचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र केवळ 40 टक्के काम झाले आहे. दोन वर्षाची मुदत संपल्यामुळे पून्हा सहा महिन्याची मुदत दिली जाणार आहे. त्यामुळे जून 2020 पर्यंत उर्वरित 60 टक्के काम पूर्ण करण्याचे आव्हान मक्तेदारांसमोर ठाकले आहे.
अमृत योजनेअंतर्गत जळगाव मनपाला 253 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली.त्यानुसार जैन इरिगेशन कंपनीला 191 कोटींचा ठेका देण्यात आला आहे.दि.17 नोव्हेबर 2017 कार्यादेश देवून 16 नोव्हेबर 2020 पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र मुदतीत आता पर्यंत केवळ 40 टक्के काम पूर्ण झाले आहे.कंपनीतर्फे वर्षभर मुदतवाढीची मागणी केली होती.परंतु वर्षभराची न देता सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात येणार असून येत्या दोन-तीन दिवसात मुदतवाढीबाबत पत्र दिले जाणार असल्याची माहिती सुत्रानी दिली.
80 हजार पेक्षा अधिक नळसंयोजन अपेक्षित
जळगाव शहरासह विस्तारित भागात 80 हजार पेक्षा अधिक नळसंयोजन अपेक्षित आहेत. अमृत अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे सुप्रिम कॉलनी,अयोध्यानगर,मोहननगरसह काही भागात आतापर्यंत 15 हजार नळसंयोजनची जोडणी पूर्ण झाली आहे.
मिटरसाठी चाचपणी
अमृत पाणीपुरवठा योजनेचे 24 बाय 7 पाणीपुरवठा करण्याचे उदिष्ट आहे.त्यासाठी मिटर लावणे अपेक्षित आहे.मात्र मिटरसाठी तांत्रिकदृष्ट्या अडचण निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी चाचपणी सुरु आहे.