जळगाव । शहरातील प्रभाग समिती 1मधील भागांमधील नाल्यातून जाणार्या पाणी पुरवठा विभागाच्या वितरण वाहिन्या स्थलांतरीत करण्याची विनंती प्रभाग अधिकारी व्ही. ओ. सोनवणी यांनी पाणी पुरवठा अभियंता खडके यांना दिलेल्या पत्रातून केली आहे. बहिणबाई उद्यानामागील नाल्यावरील कल्व्हर्टवरील नाल्यावरील कल्व्हर्ट जवळ अंकुर हॉस्पिटलच्या बाजुला, आदी भागात पाणी पुरवठा विभागाचे वितरण वाहिन्या आहे.
प्रभाग अधिकार्यांचे पाणी पुरवठा अभियंत्यांना पत्र
तसेच भिकमचंद जैन नगर ते सुरत रेल्वेगेट पर्यंतच्या नाल्यात ठिकठिकाणी पाणी पुरवठा विभागाचे वितरण वाहिन्या क्रॉस झालेल्या आहेत. जसे जेडीसीसी डायरेक्टर बंगल्यामागील भाग तसेच म्हाडा कॉलनी समोरील सुरत रेल्वेगेट जवळील पुला जवळ पाणी पुरवठा विभागाचे वितरण वाहिन्या गेल्याने नाल्यातून वाहून येणार कचरा याठिकाणी अडकून पाणी अडकत आहे. हे पाणी जवळील घरामध्ये घुसत असल्याने बहिणाबाई उद्यान मागून राष्ट्रीय महामार्गपासून ते खॉजामिया रोडपर्यंत ते पिंप्राळा रेल्वेगेट तसेच पिंप्राळा रेल्वेगेट ते सुरत रेल्वेगेट पर्यंत वाहणार्या मुख्यनाल्याला ठिकठिकाणी क्रॉस होणारे पाणी पुरवठा विभागाचे वितरण वाहिन्या त्वरीत शिप्ट करण्यात यावी अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे.