नगराध्यक्ष मनीषा चौधरी यांची माहिती
चोपडा – येत्या तीन ते चार दिवसात शहरात पिण्याचा पाणीपुरवठा सुरळीत होणार असुन त्यासाठी गुळ मध्यम प्रकल्पाच्या ठिकाणी युध्दपातळीवर काम सुरू असुन त्यासाठी तात्पुरते जॅकव्हेल बसविण्यात येणार आहे. हे काम दोन दिवसात पुर्ण होणार आहे. यासाठी गावाच्या निर्माण होणार्या समस्येचा अंदाज घेत १४ व्या वित्त आयोगातुन जिल्हाधिकार्यांची परवानगी घेत ४० लाखाची मंजुरी घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांनी दिली.
तापी नदीपात्रात पाणी साठा उपलब्द असल्याने गुळ मध्यम प्रकल्पातुन आवर्तन सोडण्यता येते. तेव्हा शहरात पाणी पुरवठा होत असुन १० ते १५ दिवसाआड नागरीकांना पाणी मिळत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. यासाठी टप्पा क्र. २ मध्ये ६८ कोटी रूपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर असुन त्या माध्यमातुन पाईपलाईनचे कामही युध्द पातळीवर सुरू आहे. ते ५ एप्रिलपर्यंत पुर्ण होणार आहे. तात्पुरते जॅकवेलच्या माध्यमातुन पाणीपुरवठा हा जुन्या जलशुध्दीकरण प्रकल्पात हे पाणी आणुन शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे. शहराला पाणी कमी पडु देणार नसल्याची माहिती नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांनी दिली.