जळगाव । गिणा टाकीजवळ वाघूर पाणी पुरवठा योजनेअंर्गत टाकण्यात आलेली 1200 मीमी पाईप लाईनमध्ये गुरूवारी गळती झाल्याने ती दुरूस्तीसाठी युद्धपातळीवर काम सुरू होते. परंतु, गळती दुरूस्ती करण्यापलीकडे असल्याने तेथील 5 मीटर लोखंड पाईप बदलविण्यात आला आहे. यामुळे आता 48 तासानंतर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. आज नादुरूस्त पाईप लाईन बदलवून नवीन पाईप टाकण्याचे काम सुरू होते. मात्र, पाईप बदलवतांना पाईपमधील पाण्याने अडथळा येत होता. उतार असल्याने पाईपमध्ये पाणी साचत असल्याने दुरूस्ती करतांना अडचणीचे ठरत होती. मात्र अथक प्रयत्नानंतर रविवारपासून नियोजित वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
दुरूस्तीमध्ये उतार असल्याने अडथळा
आज नादुरूस्त पाईप लाईन बदलवून नवीन पाईप टाकण्याचे काम सुरू होते. मात्र, पाईप बदलवतांना पाईपमधील पाण्याने अडथळा येत होता. उतार असल्याने पाईपमध्ये पाणी साचत असल्याने दुरूस्ती करतांना अडचणीचे ठरत होती. आज पाणी पुरवठा विभागाच्या नियोजनानुसार शहरात पाणी पुरवठा झाला नाही. पाणी पुरवठा न झाल्याने नागरिकांना पाण्याच्या कृत्रिम टंचाईला समोरे जावे लागत आहे. घरातील पाणी संपल्याने त्यातच पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सोमवारी होणारा पाणीपुरवठा
खंडेराव नगर, पिंप्राळा गावठाण, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबा नगर, मानराज टाकी परिसर, शिंदे नगर, अष्टभुजा, वाटिकाश्रम, निवृत्ती नगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी, नित्यानंदनगर, संभाजी नगर, रायसोनी नगर, समतानगर परिसर, सानेगुरुजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर, गिरणा टाकी आवारातील उंच टाकी, भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हेनगर, अंबिका सोसायटी, शिवकॉलनी, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी.
रविवारी होणारा पाणीपुरवठा
वाल्मिकनगर, कांचननगर, दिनकर नगर, आसोदा रोड, सप्तश्रृंगी कॉलनी, महाजननगर, एकनाथनगर, मंगळपुरी, दत्तनगर, रामचंद्रनगर, सदगुरू नगर, मोहननगर, नेहरूनगर, हरिविठ्ठल नगर, पिंप्राळा गावठाण परिसर, दांडेकर नगर, मानराजपार्क, असावा नगर, निसर्ग कॉलनी, द्रौपदी नगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलिस कॉलनी, खोटेनगर, गेंदालाल मिल, शिवाजीनगर हुडको, प्रजापत नगर, एस. एम. आयटी परिसर, तांबापुरा, शामाफायर, वाघनगर, हरिविठ्ठल नगर, शिवकॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंद नगर, जिल्हारोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी, ऑफिसर क्लब या भागात पाणीपुरवठा होणार आहे.