पाणी पुरवठ्यातील 35 एच.पी.मोटार अखेर दुरुस्त

0

नवापूर । नवापुर नगर परिषदेच्या पाणी पुरवठातील 35 एच पी ची मोटर महिन्यापासुन बिघाड झाली होती त्यामुळे नवापूर शहरातील रंगावली नदी पात्रात मुबलक पाणी असुन देखील शहरवासियांना ते मिळत नव्हते.कारण मोटार बिघाड झाल्याने नदीपात्रातील जँकवेलमधुन पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता.अखेर एक महिन्यांनी 35 एच पी ची मोटर दुरुस्ती झाली म्हणून उद्यापासून नवापुरकरांना पाणी पुरवठा पाऊस येई पर्यंत व्यवस्थित होईल प्रभागतील नागरीकांनी याची दखल घ्यावी असे नगर पालिकेचा सुत्राकडुन कळविण्यात आले आहे.

लोकसहभागातील कामाचे फलित
या महिन्यात नवापूरकरांना पाण्यासाठी खुपच कसरत करावी लागली. मोटार दुरुस्तीसाठी कारागीर नगर पालिकेला मिळत नव्हते म्हणे. मोटार दुरुस्ती साठी पाठविण्यात आली होती. मोटार नादुरुस्त अभावी पाणी असुन शहराला मिळत नव्हते. नगरसेवकांना पाणी टँन्कर पाठवुन आपल्या प्रभागातील रहिवाशांना पाणी पुरवठा करावा लागत होता. मोटार दुरुस्तीसाठी म्हणे नगर पालिकेचा अध्यक्षा,सभापती. सर्वांनी मोटर प्रयत्न चालविला होता. रंगावली धरणातुन पाणी सोडल्याने तीव्र उन्हाळ्यात शहराला भरपुर पाणी पुरवठा होत आहे.मागचा दोन वर्षा पासुन दैनिक पत्रकार संघ रंगावली धरणातील गाळ काढत आहे मागचा वर्षी भरपुर पाऊस झाल्याने गाळ काढलेल्या ठिकाणी पाण्याचे भरपुर संचय झाला होता त्याचा फायदा आज नवापूर शहराला झाला ते धरणातील पाणी शहरातील नागरीकांना कामात येत आहे. काढलेला गाळ व त्यामुळे पाण्याचे झालेला संचय हे पत्रकार संघाने लोकसहभागातुन धरणातील काढलेल्या कामाचे फलीत आहे.