बोदवड । पंचायत समिती सभापतींना उर्मटपणे अपमान करणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी सभापती गणेश पाटील यांनी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. जिल्हाधिकार्यांच्या आश्वासनानंतर आमदार एकनाथराव खडसे यांच्याहस्ते पाटील यांचे उपोषण सोडण्यात आले.
उपोषणस्थळी यांची होती उपस्थिती
शहरातून यावेळी जिल्हाधिकार्यांनी बोदवड तालुक्यातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी जळगाव येथे येवून नियोजन केले जाईल. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याचे निमंत्रण दिले. याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी सभापती राजू माळी, जिल्हा परिषद सदस्य भानुदास गुरचळ, दूध संघाचे संचालक मधुकर राणे, तालुका समन्वयक अध्यक्ष अनिल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष भागवत टिकारे, सईद बागवान, उपसभापती दिपाली राणे, बाजार समिती संचालक रामदास पाटील, पंचायत समिती सदस्य किशोर गायकवाड, गटनेता कैलास चौधरी, कैलास माळी, स्विकृत नगरसेवक अनिल खंडेलवाल, सलिम कुरेशी, सलामो÷द्दीन शेख, अनिल वराडे, विनोद कोळी, रुपेश गांधी, दिपक वाणी, श्रीकृष्ण राणे, राकेश बोरसे, निलेश माळी, निवृत्ती पाटील, किरण वंजारी, दिपक घुले, विनोद चौधरी, दिपक चौधरी, प्रकाश पागळे, पंढरी पाटील, प्रताप चव्हाण, पवन चव्हाण, मच्छिंद्र साळुंके, अरुण पारधी उपस्थित होते.
टंचाईग्रस्त गावांमध्ये पाठविणार टँकर
तालुक्यातील मनुर बु., चिंचखेडसिम, गोळेगाव खुर्द, निमखेड, शिरसाळा, साळशिंगी, लोनवाडी, जलचक्र बुद्रुक, सुरवाडा बुद्रुक, सुरवाडा खुर्द, कोलाडी शेलवड, आमदगाव, हिंगणे, राजुर, कुर्हाहरदो, घाणखेड, धोंडखेड, नांदगाव, मुक्तळ या 21 गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाळा लांबल्यामुळे बोदवड तालुक्यात टंचाईच्या झळा अधिक जाणवू लागल्या आहेत. यासंदर्भात या गावातील सरपंचांनी पंचायत समितीत येून सभापती गणेश पाटील यांना समस्या सोडविण्यासाठी निवेदन दिले होते. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी हे आढावा बैठकीसाठी पंचायत समितीत आले असता त्यादृष्टीने पाणीटंचाई समस्येवर सभापती गणेश पाटील हे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याशी चर्चा करीत असतांना दिवेगावकर यांनी सभापतींना अपमानित केले होते. त्या निषेधार्थ दिवेगावकर यांच्यावर कारवाई करण्याच्या मागरीसाठी सभापती पाटील यांनी गेल्या दोन दिवसांपासून तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते. जिल्हाधिकार्यांनी या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यामुळे उपोषण सोडण्यात आले.