जळगाव । शहरात 11 जून रोजी झालेल्या पावसाने सखल भागात पाणी शिरले होते. ज्या भागात पाणी शिरले होते त्या भागांची पहाणी आयुक्त जीवन सोनवणे यांनी शुक्रवार 16 जून रोजी केली. याप्रसंगी त्यांच्या सोबत शहर अभियंता एस. एस. भोळे, आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील, प्रभाग समिती अधिक्षक उदय पाटील, सुशील साळुंखे, अग्निशमन अधिक्षक वसंत कोळी, अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान आदी उपस्थित होते.
आयुक्तांनी केल्या सूचना
आयुक्त सोनवणे यांनी कानळादा रोडवरील लक्ष्मीनगर, नवीन बी. जे. मार्केट, सर्माट कॉलनी, रामेश्वर कॉलनी, अंबर झरा पाटचारी यांची पहाणी केली. यावेळी पहाणी करून आयुक्त सोनवणे यांनी सूचना केल्यात. यात रामेश्वर कॉलनीमध्ये चारी टाकून गटार बांधण्याची सूचना आयुक्तांनी केली. तसेच लक्ष्मी नगरात खाजगी घर मालकाला ओटा उंच करण्याची सूचना करण्यात आली. नवीन बी. जे. मार्केट येथील व्यापार्यांना सूचना करण , सम्राट कॉलनीतील गल्यांचे लेव्हल घेऊन गटारी तयार करण्याचे एस्टीमेट तयार करण्याच्या सूचना बांधकाम अधिक्षक सुनील भोळे यांना आयुक्तांनी केली. तसेच अंबर झरा पाटचारीवर अधिकृत रस्ता आहे का याची तपासणी करण्याचे सूचीत करण्यात आले. तसेच यावर रस्ता बांधण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना पत्र देऊन मागणी करण्यात येणार आहे.