शिरपूर । तालुक्यात पाण्याचे काम मोठ्या प्रमाणात यशस्वीरीत्या सुरु असून भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावण्यासाठी पाण्याचा थेंब न थेंब जिरविण्याचे काम करीत आहोत. पुढील पिढीसाठी पाण्याचे काम महत्वपूर्ण ठरणार आहे. चांगल्या कामात लोकसहभाग देखील वाढणे गरजेचे आहे. अनेर धरणाच्या उजव्या कालव्याच्या 14 नं. चारीमुळे अनेक शेतकरी बांधवांच्या शेतापर्यंत पाणी पोहचण्यास मोठी मदत झाली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी पाण्याचे काम चांगल्या रीतीने केले आहे. सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले असून असे सांगून व्यसनापासून दूर राहण्याचा महत्वपूर्ण सल्ला आमदार अमरिशभाई पटेल यांनी दिला.
परिसरातील पाटचार्यांची पाहणी
अनेर धरणापासून तब्ब्ल 25 कि.मी. अंतरावर आलेल्या 14 नं. चारीचे जलपूजन माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले. यावेळी त्यांनी परिसरातील विविध पाटचारींची देखील पाहणी केली.थाळनेर येथे मंगळवार 20 जून रोजी आ. अमरिशभाई पटेल यांनी जलपूजन करुन शेतकरी बांधवांच्या शेतापर्यंत पाणी पोहचविण्याचे मोठे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले.
जलसिंचनाची कामे यशस्वी
यापूर्वी 6 जून रोजी धरमखोयी नाल्यातील गाळ काढण्याच्या कामास प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला होता. ते काम देखील प्रगतीपथावर आहे. तालुक्यातील विविध भागातील जलसिंचनाची अनेक कामे यशस्वीरीत्या पूर्ण होत असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्य्क्त् करण्यात येत आहे.
यांची होती उपस्थिती
याजलपुजन प्रसंगी साखर कारखाना संचालक ज्ञानेश्वर पाटील, नरेंद्रसिंह जमादार, बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, एकनाथ जमादार, के.डी.पाटील, गोपाल भंडारी, सर्जेराव पाटील, पं.स. उपसभापती संजय पाटील, व्ही.एस.पाटील, वसंतभाई गुजराथी, पं.स. सदस्य उज्वल पाटील, प्रकाश पाटील, धनराज मराठे, भरत मराठे, अविनाश पाटील, भोरटेकचे विजयसिंह गुर्जर आदी उपस्थित होते.