जळगाव। पाण्याची टाकी चोरल्याच्या संशयावरून तिघांनी रिक्षाचालक तरूणाला मारहाण केल्याची घटना मंगळवारी 10.45 वाजता पिंप्राळा रेल्वेगेटजवळ घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तरूणाच्या फिर्यादीवरून मारहाण करणार्या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहुनगरातील रिक्षाचालक अहमद खान दाऊद खान (वय-27) हे मंगळवारी रात्री पिंप्राळा रेल्वेगेटजवळील अरूण नामक व्यक्तीच्या टपरीजवळ उभे असतांना त्या ठिकाणी सुमित (पुर्ण नाव माहित नाही) व त्याचे दोन मित्र त्या ठिकाणी आले आणि पाण्याची टाकी चोरीच्या संशयावरून त्यांनी अहमद यांच्याशी वाद घातला. यानंतर एकाने पाईपाने त्यांना मारहाण केल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले.
यानंतर रात्रीच अहमद खान यांनी जिल्हा पेठ पोलिस स्टेशन गाठत तिघांविरूध्द तक्रार दाखल केली. त्यानुसार मारहाण केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात सुमित व त्याच्या दोन मित्रांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास पीएसआय अजितसिंग देवरे हे करीत आहेत.