चिंचवड । येथे लोकमान्य रुग्णालयाजवळील जलवाहिनीचा व्हॉल्व अज्ञातांनी तोडून चोरून नेल्याने गुरुवारी पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. व्हॉल्व चोरून नेल्याने जलवाहिनीतील हजारो लीटर पाणी वाया गेले.
स्थानिक नागरिकांनी या प्रकाराविषयी महापालिका अधिकार्यांना कळविल्यानंतर महापालिका कर्मचार्यांनी तत्परतेने त्या भागातील पाणी पुरवठा थांबवून नवीन एअर व्हॉल्व बसविला. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही काळ वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली होती. दरम्यान, व्हॉल्व तोडून चोरून नेणार्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.