पाण्याची मोटार चोरीला

भुसावळ : तालुक्यातील पिंप्रीसेकम येथे घराचे बांधकाम सुरू असताना चोरट्यांनी दोन हजार चारशे रुपये किंमतीची इलेक्ट्रीक पाण्याची मोटार लांबवली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

घराबाहेर लांबवली मोटार
तक्रारदार किशोर मधुकरराव तायडे (पिंप्रीसेकम) यांच्या मुलाचे गावात घराचे बांधकाम सुरू असून कामासाठी असलेली इलेक्ट्रीक पाण्याची मोटार चोरट्यांनी 2 ते 3 ऑगस्टच्या दरम्यान लांबवली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात तायडे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक योगेश पालबेनेम करीत आहेत.