चाळीसगाव । चाळीसगाव शहराला नगर परीषदेच्या वतीने गिरणा धरणावरून थेट पाणी पुरवठा होत असतो, चाळीसगाव शहराला गिरणा धरणावरून थेट पाणीपुरवठा होत असतो, मात्र गेल्या दोन महिन्यापासून पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन सतत वेगवेगळ्या ठिकाणी फुटत असून त्यामुळे शहराला अखंडित पाणी पुरवठा नगरपरिषदेच्या वतीने होत नाही. पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन सतत कुठेना कुठे फुटण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहे. मात्र गेल्या दोन महिन्यापासून पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन सतत वेगवेगळ्या ठिकाणी फुटत असून त्यामुळे शहराला अखंडित पाणीपुरवठा नगरपरिषदेच्या वतीने होत नाही, तो लवकर सुरळीत होण्यासाठी पालिकेच्या वतीने पावले उचालावित, अशी मागणी रयत सेनेच्या वतीने 10 जानेवारी रोजी नगरपरीषद मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे.
आंदोलन करण्याचा दिला इशारा
यामुळे शहरवासीयांना पाण्याची कमतरता भासून पाण्याची समस्या उद्भवत आहे. अचानक उदभवणार्या पाण्याच्या समस्याने शहरातील नागरीक त्रस्त झाले असुन झोपडपट्टी भागात पाणी साठविण्याची कुटलेहे साधन नसल्याने त्यांची तर फार मोठी पचाईत होत आहे. पाणी केव्हा येईल याची कुटलीही माहिती नसल्याने नागरीक मात्र नळाला पाणी केव्हा येईल. यासाठी नगरसेवकांकडे विचारणा करत असतात मात्र त्यांच्याकडे ही या प्रश्नाचे उत्तर मिळत नसल्याने ते अणुउत्तरीत राहतात म्हणून नगरपरिषदेच्या वतीने गिरणा धरणावरून येणार्या सपूर्ण पाईपलाईनची तज्ञ विभागाकडून तपासणी करून सतत होणार्या पाईपलाईन फुटण्याची प्रकार कायमची थाबवावे तसेच चाळीसगाव शहर वासियांना नियमित पाणी पुरवठा करावा जेणे करून नागरिकाना पाण्यासाठी भटकंती होऊ नये. पाणीपुरवठा लवकर सुरळीत न झाल्यास रयत सेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी नगरसेविका विजया पवार, विश्ववास चव्हाण उपस्थित होते.
निवेदनावर यांच्या स्वाक्षर्या
नागरीकांचा पाण्याचा प्रश्न लवकर सोडवुन अखंडीत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी रयत सेनेतर्फे 10 रोजी नगरपरीषद मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, जिल्हाअध्यक्ष संजय कापसे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोल्हे, कार्याध्यक्ष सुहास पाटील, तालुका उपाध्यक्ष विलास मराठे, योगेश पाटील, बाळु मुलमुले, सुनिल शिंदे, आबा जगताप, विजय पाटील, रोहन पाटील, सचिन जाधव, सुनिल निबाळकर आदींच्या स्वाक्षर्या आहेत.