अमळनेर । यावर्षी उन्हाळ्याची तिव्रता अधिक होती. त्यामुळे पाण्याची पातळी खालावली होती. वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान अमळनेर येथे पाण्याचा शोधात असलेले तीन वर्षाची हरीण विहिरीत पडली. रस्त्यावरून दोन शाळकरी मुलांच्या लक्षात ही घटना आल्यानंतर त्यांनी हरणांना वाचविले. जखमी हरिणवर उपचार करण्यात आले. मंगरूळ येथून जवळच असलेले जानवे शिवारातील जंगलात हरणे, मोर प्राण्यांची संख्या मोठी आहेत. पाण्याचा शोध घेत 3 वर्षाचे हरीण मंगरूळ येथील शिरुड रस्त्यावरील औद्यागिक वसाहीतीजवळील समोरील विहिरीत पडले.
कै.अ.रा.पाटील माध्यमिक विद्यालयाचे विध्यार्थी सागर सुरेश पारधी आणि दीपक खंडू कोळी हे मजुरी साठी कारखान्यात जात असताना त्यांच्या निदर्शनास ही घटना आली त्यांनी तात्काळ विहिरीत उतरून हरणाला बाहेर काढले. किरण वारुळे यांनी वनपाल वाय.यू.पाटील यांना कळवले त्यांनी तात्काळ जखमी हरीणला पशु वैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. डॉ.व्ही.बी.भोई व डॉ.एस.वाय.पाटील यांनी हरणावर उपचार केले. हरणाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर जंगलात सोडण्यात आले. पावसाळा तोंडावर आहे मात्र जोरदार पावसाळा झाल्याशिवाय जंगलातील प्राण्यांना पाणी मिळणार नाही त्यामुळे जंगलात पाण्यासाठी कृत्रीम तळे करुन प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.