पाण्यापासून शेतकरी वंचित !

0

शहादा । कारखान्यांसाठी पाणी उपलब्ध होत असते अधिकार्‍यांचे संगनमत त्यांच्यासाठी असते पण शेतकर्‍यांसाठी पाणी नाही आपल्या हक्काचा वडिलोपार्जित जमिनितुन शेतकरी पाणी घेतो शेतकर्‍यांना त्यांचा हक्कापासुन वंचित केले जाते शेतकर्‍यांवरती गुन्हे दाखल करण्या संदर्भात नोटीसा बजावल्या आहेत. ही कार्यवाही पालकमंत्री अथवा जिल्हाधिकारी यांच्या आदेशांवये झाली असेल , राज्य सरकार देशाचा विरोधातले असल्याचे स्पष्ट होते, अशी माहिती शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे उतर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी यांनी दिली.

लघुसिंचनच्या पाटचार्‍यांवरील अतिक्रमणांचे काय ?
शहादा शहर सह परिसरातील लघुसिंचन विभागाचा पाटचार्‍या नामशेष झाल्या आहेत. अतिक्रमण करुन त्यांचावर घरे, व्यापारी संकुले बांधण्यात आलेली आहेत . त्यांचावर कार्यवाही करण्याची हिम्मत लघु सिंचन विभाग करु शकत नाही . गरीब शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची हिम्मत दाखवतात, राजकीय दबावाखाली कार्यवाही केली जाते. शहादा शहर सह तालुक्यातील नामशेष झालेल्या पाटचार्‍या कार्यान्वित कराव्यात अशी जुनी मागणी संघटनेची आहे. शेतकर्‍यांचे हित लक्षात घेतले जात नाही, असे घनश्याम चौधरी यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत नंदुरबार तालुकाध्यक्ष कृष्णदास पाटील, नंदुरबार उपजिल्हाध्यक्ष नथु पाटील, शहादा तालुका अध्यक्ष वसंत पाटील सह वावद चौपाळा येथील शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

…अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन
आतापर्यंत जिल्ह्यातील एकाही सिंचन प्रकल्पातुन पाणी मिळाले नाही हे शेतकर्‍यांचे दुर्दैव आहे. शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीसाठी पाणी मिळालेच पाहिजे हा त्याचा हक्क आहे. शेतकर्‍यांना पाणी द्यायचे नसेल त्यांच्या हक्कापासुन वंचित केले जात असेल तर वावद लघुसिंचन प्रकल्पातील भुसंपादित केलेली जमीन परत करावी. शेतकर्‍यांना पाण्यासाठी अडथळे आणले किंवा गुन्हे दाखल केल्यास शेतकरी संघटना रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल. होणार्‍या परिणामास जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता लघु सिंचन पाट बंधारे विभाग राहतील असा इशारा त्यांनी दिला. चौपाळे शिवारातील योगेश श्रीपत चौधरी, श्रीकृष्ण श्रीपद चौधरी, राजाराम दौलत पाटिल, लिमजी चौधरी, रविंद्र पाटिल, चंपालाल बंसी चौधरी यांना गुन्हे दाखल करण्याबाबत नोटीसा बजावल्या आहेत. याबाबत स्पष्टीकरण करतांना शेतकर्‍यांच्या हक्कावर गदा आणल्याची भावना व्यक्त होत आहे.

शेतकर्‍यांवरील दाखल गुन्हे अन्याय्य…
वावद ता नंदुरबार येथील लघुसिंचन प्रकल्प अंतर्गत संपादित असलेल्या शेतजमीन ओलीताखाली आणण्यासाठी लघुसिंचन , पाट बंधारे विभाग धुळे यांनी आधिच पाणी वापरण्यासाठी परवानगी दिली होती त्या अनुशंगाने हंगाम सुरु होत आहे म्हणून शेतकर्‍यांनी विंधन विहीरीचे पाणी वापरत होते मात्र लघुसिंचन पाट बंधारे विभाग धुळे कार्यकारी अभियंता के. टी. सूर्यवंशी यांनी चौपाळे शिवारातील पाच शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचा नोटीसा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दिल्या आहेत. शेतकर्‍यांवर होणार्‍या अन्यायाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत घनश्याम चौधरी यांनी शेतकर्‍यांवर होणार्‍या अन्यायाचा पाढा वाचला.