पाण्याला साक्ष ठेवून जलप्रदुषण न करण्याची शपथ

0

पिंपळनेर । डांगशिरवाडे परिमंडळ अंतर्गत येणार्‍या पिंपळपाडा खुर्द येथे शासनाच्या आदेशानुसार नदी, नाल्यावर जाऊन नदी नाले प्रदूषित होणार नाही यासाठी प्रदूषण मुक्तीची शपथ घेतली. यावेळी पिंपळपाडा अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थी, शिक्षक प्रतिज्ञा घेण्यासाठी उपस्थित होते. आम्ही वैयक्तिक कोणत्याही प्रकारे जलप्रदूषण करणार नाही, नदीमध्ये प्लास्टिक, कचरा, निर्माल्य, तत्सम प्रदूषणकारी घटक टाकणार नाही, सर्व लहान मोठ्या नद्यांच्या काठावर मोठ्या प्रमाणात करण्यात येणार्‍या रक्षणाबददल मी सक्रिय सहभागी होईल व इतरांना त्यासाठी मदत करेल, नदी अभियानांतर्गत नदीच्या पुनरुज्जीवनासाठी मी सर्वोतरी प्रयत्न करीन अशी शपथ यावेळी घेण्यात आली.

स्वच्छता ठेवण्याचे आवाहन
आम्ही वैयक्तिक कोणत्याही प्रकारे जलप्रदूषण करणार नाही, नदीमध्ये प्लास्टिक, कचरा, निर्माल्य, तत्सम प्रदूषणकारी घटक टाकणार नाही, सर्व लहान मोठ्या नद्यांच्या काठावर मोठ्या प्रमाणात करण्यात येणार्‍या रक्षणाबददल मी सक्रिय सहभागी होईल व इतरांना त्यासाठी मदत करेल, नदी अभियानांतर्गत नदीच्या पुनरुज्जीवनासाठी मी सर्वोतरी प्रयत्न करीन अशी शपथ यावेळी घेण्यात आली. कार्यक्रमासाठी वनक्षेत्रपाल मीनाक्षी जोगदंडे यांच्या आदेशानुसार वनविभागाचे वन कर्मचारी डी.के.निकम, दिपक भोई, एस.डी.नांद्रे पाटील, पोसलू राऊत, हौसू गायकवाड, वसंत चौधरी, चिंधा चौरे यांसह आश्रम शाळेचे आर.व्ही.दशपुते, एस.एस.भदाणे, एस.आर.कोठावदे, व्ही.एन.ठाकरे, एस.एच.कुवर आदी उपस्थित होते.