पाण्यासाठी थकीत वीज बिल भरा

0

नंदुरबार । जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांकडे 34 कोटी वीजबिलाची थकबाकी झाली आहे. पिण्याचे पाण्याचा प्रश्न महत्वपुर्ण आहे. सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी वीजबीलाची थकबाकी भरणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतींनी मुळ थकबाकीचा पहिला हप्ता 20टक्के व चालु वीज बील 8 संप्टेबरपर्यंत भरावे. उर्वरित मुळथकबाकी चालु वीजबीलासह वर्षभरात हप्त्याने भरावी. यासाठी सर्व गटविकास अधिकार्‍यांनी संबंधित ग्रामसेवकांना ग्रामपंचायतीकडून वीजबील भरून घेण्याबाबत सुचित करावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले आहेत.

यांची होती उपस्थिती
जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची वीजबील थकबाकी भरण्याच्या अनुषंगाने शुक्रवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे, महावितरणचे अधिक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण, उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री.पठारे, कार्यकारी अभियंता अनिल पाटील, कार्यकारी अभियंता धनंजय भामरे,गटविकास अधिकारी एन. डी. वाडेकर, गटविकासअधिकारी व्ही.जी.बोडरे, गटविकास अधिकारी उदयकुमार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रामसेवकांनी थकीत वीज बिल भरून घ्यावे
जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी थकीत वीज बिलांबाबत गटविकास अधिकार्‍यांनी ग्रामसेवकांचे सहाकार्य घेण्याचे आवाहन केले. ग्रामसेवकांनी संबंधीत ग्रामपंचायतींचे थकीत वीज बिल भरून घेण्याबाबत पुढाकर घेण्याचे निर्देश दिले आहेत. नंदुरबार विभागातील 462 पाणीपुरवठा योजना ग्राहकांकडे 16 कोटी 6 लाखांची थकबाकी असल्याची माहिती दिली. सर्व ग्रामपंचयतींनी पाणी योनांच्या अखंडीत वीजपुरवठ्यासाठी थकबाकी भरणे आवश्यक असल्याचेही डॉ. कलशेट्टी यांनी
सांगितले.

महावितरणला सहकार्य करा
सदर बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे यांनी वीजबील थकबाकी भरून महावितरणला सहकार्यकरावे,असे आवाहन केले. जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांना महावितरणचे अधिक्षक अभियंतायांनी ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची वीजबील थकबाकीबाबत पत्र दिले होते. नंदुरबार विभागातील 462 पाणीपुरवठा योजना ग्राहकांकडे 16 कोटी 6 लाख व शहादा विभागातील 391 पाणी पुरवठा योजना ग्राहकांकडे 18 कोटी27लाख रूपये वीजबील थकबाकी आहे. ग्रामपंचायतींनी पाणी योजनांच्या अखंडीत वीजपुरवठ्यासाठी थकबाकीभरून सहकार्य करावे ,असे महावितरणचे आवाहन आहे.