पाण्यासाठी महिलांचा मोर्चा

0

शिंदखेडा। ऐन पावसाळ्यात शिंदखेडा शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. कॉलनी परीसरासह पूर्ण शहरात बारा ते पंधरा दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. शहरातील संतप्त महिलांनी काल आणि आज येथील नगरपंचायतीवर हंडा मोर्चा काढत निषेध व्यक्त केला. सुयोग भदाणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला . येत्या दोन दिवसांत पाणीपूरवठा सूरळीत होईल असे आश्वासन उपनगराध्यक्षांसह मूख्याधिकारी अजित निकत यांनी दिल्यानंतर निर्माण झालेला तणाव निवळला.

तात्पुरती योजना पूर्णपणे बंद
शहराला सध्या अक्कडसे तसेच सूलवाडे बॅरेजमधून पाणी पूरवठा सूरू आहे. मात्र दहा दिवसापूर्वी तापी नदीला आलेल्या पूरामूळे सूलवाडे येथून पाणी पूरवठा करणारी तात्पूरती पाणी योजना बंद पडली. पाण्यावर तरंगत्या मोटारी असल्याने पूरामूळे त्या काढून घेण्यात आल्या. बॅरेजचे दरवाजे ऊघडल्यामूळे ही तात्पूरती योजना पूर्णपणे बंद पडली आहे. तर राहीलेल्या अक्कडसे योजनेच्या ईलेक्ट्रीक मोटारी पूराच्या गढूळ पाण्याने नादूरूस्त झाल्या. पूराचे पाणी ओसरल्याशिवाय त्या काढता येणेही शक्य नव्हते. परीणामी शहरातील पाणीपूरवठा पूर्णपणे कोलमडला आहे.

दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करणार
नगरपंचायत स्तरावर मोटारी बदलवण्याचे काम यूध्द पातळीवर सूरू आहे. आज किंवा उद्यापासूनच पाणीपूरवठा नियमित सूरू होईल असे नगरपंचायतीतर्फे सांगण्यात आले.महिलांचे म्हणणे- वारंवार मोटारी जळतात आणि दहा दहा दिवस पाणी पूरवठा बंद राहतो. नगरपंचायत कोणत्या जमान्यात आहे. चाळीस हजार लोकवसतीच्या शहरात नगरपंचायत कडे जादा ईलेक्ट्रीक मोटारी असू नये याचे आश्चर्य वाटते. मोर्चेकर नागरीकांनी व महिलांनी उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख,व मूख्याधिकारी अजित निकत यांना निवेदन दिले.निवेदनावर सुयोग भदाणे, तुषार सोनवणे,विजय चव्हाण, संदिप पाटिल,सुरेश सिंधी,अ‍ॅड.विनोद पाटिल, सुवर्णा सोनवणे,आशाबाई पवार,भारती बोरसे यांच्यासह इतर नागरीकांच्या सह्या आहेत

मुख्याधिकार्‍यांना विचारला जाब
गेल्या पंधरा दिवसापासून शहरातील पाणीपूरवठा पूर्णपणे बंद आहे. नारगीकांचे परीणामी प्रचंड हाल होत आहे. ऐन श्रावण महिन्यात पाण्याअभावी विना आंघोळीचे राहण्याची वेळ नागरीकांवर आली आहे. काल राजपूत गल्लीतील आणि आज कॉलनी परीसरातिल संतप्त महीलांनी थेट नगरपंचायत गाठून मूख्याधिकारी अजित निकत यांना जाब विचारला. इतके दिवस पाणी नाही आपण काय करता आहात असा संपप्त सवाल उपस्थित करीत पाणीपूरवठ्याची मागणी केली. उपनगराध्यक्ष ऊल्हास देशमूख आणि निकत यांनी दोन दिवसांत पाणी पूरवठा सूरळीत होईल असे आश्वासन दिले.