शिरपूर । येथील प्रसिध्द धार्मिक स्थळ असलेल्या पाताळेश्वर मंदिर संस्थानच्या विश्वस्तपदी नगरसेविका आशा राजेश बागूल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपालिकेच्या बैठकीत एकमताने ही निवड करण्यात आली. माजी उपनगराध्यक्ष सुरेश बागूल यांची कारकीर्द संपल्याने ती जागा रिक्त होती. पाताळेश्वर संस्थानात ब्राम्हण सभा, व्यापारी असोसिएशन, वकील बार असोसिएशन व नगरपालिका यांच्यातर्फे प्रत्येकी एक प्रतिनिधी विश्वस्त म्हणून असतो. यापूर्वी नगरपालिकेतर्फे सुरेश बागूल विश्वस्त होते. चेअरमन म्हणून त्यांनी मंदिराचा जीर्णोध्दार व नूतनीकरणाचे काम केले. नगरपालिकेची मुदत संपल्याने त्यांची कारकीर्द संपुष्टात आली. त्यांच्या जागेवर आशाबागूल यांची नियुक्त करण्यात आली आहे.
कुटुंबातील तिसर्या विश्वस्त
यापूर्वी माजी उपनगराध्यक्ष सुरेश बागूल, माजी नगराध्यक्षा कुसूमताई बागूल यांनी पाताळेश्वर संस्थानात विश्वस्त म्हणून कार्यभार सांभाळला आहे. आता त्याच कुटुंबातील आशा बागूल या तिसर्या विश्वस्त आहेत. सुरेश बागूल व कुसूम बागूल यांच्या त्या स्नुषा आहेत. त्यांच्या निवडीबद्दल आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, माजी नगरसेवक राजगोपाल भंडारी, मोतीलाल माळी, काशिनाथ डिगंबर माळी, कैलास गिरासे, दंगल भोई, उत्तमराव माळी, काशीनाथ तेले, देविदास अर्जुन माळी, गोविंदा अर्जुन माळी, दगा अर्जुन माळी, नागो हिलाल पाटील, मधुकर श्रावण माळी आदींनी अभिनंदन केले आहे.