पातोंडा जि.प.शाळेत वृक्षारोपण

0

अमळनेर । तालुक्यातील पातोंडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळेत हरित सेना कार्येक्रम अतर्गत 6 जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाने चार कोटी वृक्ष लागवडीचे उदिष्टे निचित केले असून त्या अनुषंगाने शालेय परिसरात सुमारे 40 रोपे लावण्यात आली.

वृक्षारोपणासाठी पातोडा गावाचे सरपंच शितल विनोद पवार आणि त्यांचे पती विनोद पवार यांच्याहस्ते लावण्यात आले. यावेळी शाळा समिती व्यावस्थापन अध्यक्ष भगवान पाटील, सदस्य पद्माकर वाघ, अधिकार पाटील, आशाबाई सोनवणे, विजय पवार, सोपान शिंदे तसेच उमेश चव्हाण यांचे सहकार्य लाभले आणि शाळेचे मुख्यध्यापक आणि इतर शिक्षक शिक्षिका उपस्थिती होती.